सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सहलीवर

विलास शिंदे
Friday, 22 January 2021

गावपाळीवरिल ग्रामपंचायत निवडणूकीत यावेळेस पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडीनंतर होत आहे.

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी बारा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५५ ग्रामपंचायतीचा ( ता. १८ ) रोजी निकाल लागला. परंतु गावाचा कारभारी होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना अद्यापपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण न सुटल्यामूळे पुन्हा 'लक्ष्मी' अस्रांचा वापर होतो की काय? अशी भिती व्यक्त होत आहे.

गावपाळीवरिल ग्रामपंचायत निवडणूकीत यावेळेस पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडीनंतर होत आहे. निवडणूकीपूर्वी सरपंच पदाची निघालेली सोडत आणि राज्य शासनाने त्या सोडतीला रद्द ठरविल्यानंतर निवडणुकीत नेतृत्व करून मोठा खर्च करणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली होती. मात्र राज्य शासनाने रद्द केलेले सरपंच पदाचे आरक्षण निवडणूकीनंतर देखील तेच कायम राहिल असे मनात निश्चित समजून गावातील राजकिय पुठार्‍यांनी ग्रामपंचायत निवडणूकीची मोर्चे बांधनी केली होती. निवडणूकीतील उत्साहाला आलेली मरगळ दूर करित निवडणूकीत रंग भरण्याचा प्रयत्न केला गेला. सरपंच पदासाठी हे चित्र स्पष्ट नसल्याकारणाने ग्रामपंचायत निवडणूकीत खर्च कमी होईल हा शासनाचा आणि सर्वसामान्य मतदारांचा अंदाज खोटा ठरवत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 'लक्ष्मी' अस्रांचा तर अनेक ठिकाणी संक्रांतीचे वाण म्हणून सोने,चांदीचा वापर झाल्याची चर्चा होत आहे.

हेही वाचानांदेडमध्ये पेट्रोल विक्रमी ९४ रुपये लिटर; केंद्र सरकारवर नाराजी; सर्वसामान्यांचा खिसा रिकामा

सरपंच पदाचे आरक्षण कोणासाठी सुटेल? हे माहित नाही.मात्र पहिलेच आरक्षण कायम राहिल. या हेतूने गावपातळीवरिल या निवडणूका लढवल्या गेल्या. आणि त्याच भावनेतून पुढिल राजकिय हालचालींना वेग येत आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये काठावर बहूमत आले आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या निवडीच्या वेळी धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. तर काही ठिकाणचे रवाना होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा तालुक्यात ऐकायला मिळत आहेत.

त्यामूळे सहलीवर गेलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना किती दिवस बाहेरगावी राहावे लागणार हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. ग्रामपंचायत सदस्यांना निवडीचे प्रमाणपत्र देणे त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण व नंतर सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होणार आहे. यासाठी मोठा कालावधी लागेल. असे राजकिय जाणकारांचे मत असल्याने गाव पुठार्‍यांसाठी राजकिय सहलीचा खर्च चांगलाच वाढणार असल्याच्या चर्चा मतदारांतून होतांना दिसत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly elected members of Gram Panchayat in Selu taluka on a trip parbhani news