esakal | चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेचा खून, पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

अवघे दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याच्या आरोपावरून पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेचा खून, पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुधीर एकबोटे

पाटोदा (जि.बीड) : अवघे दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याच्या आरोपावरून पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना तालुक्यात अंतापूर शुक्रवारी रात्री (ता.तीन) घडली आहे. संध्या उमेश गाडे (वय १८, रा.अंतापूर, ता.पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पतीच्या खूनाचा तपास लागेना, मुलांसह महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

तिचे वडील छगन सोपान तोडकर (रा. मंगरूळ, ता.आष्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे कि, संध्याचा विवाह दीड महिन्यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी उमेश अशोक गाडे यांच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यापासूनच संध्याचा सासरी छळ सुरु झाला. पती चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देऊ लागला. सोमवारी (ता.२८) संध्याचे आई-वडील तिला भेटण्यासाठी गेले असता तिने पतीकडून सतत होत असलेल्या छळाबद्दल त्यांना सांगितले होते.

गुरुवारी (ता.एक) पहाटे संध्याचा सासरा अशोक रामा गाडे याने तिच्या वडिलांना फोन कारून संध्या बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्याने पुन्हा फोन केला आणि संध्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ अंतापूर येथे धाव घेत इतर ग्रामस्थांच्या मदतीने संध्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अंमळनेर पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, उदगीरात निदर्शने !

मात्र, संध्याला पोहता येत असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासऱ्याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला अशी तक्रार त्यांनी दिली. सदर तक्रारीवरून उमेश अशोक गाडे आणि अशोक रामा गाडे या दोघांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान सासरा अशोक गाडे याने गुरुवारी पहाटेपासून संध्या बेपत्ता झाल्याचा बनाव रचला आणि तिच्या वडिलांनाही तसे सांगितले. संध्याच्या वडिलांनी अंतापूर येथे जाऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे वडील आणि सासरा या दोघांनी अमळनेर ठाण्यात जाऊन संध्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

संपादन - गणेश पिटेकर