आमदारांच्या सासऱ्यांचे उपोषण अन्‌ तलाठ्याचे निलंबन....काय आहे प्रकरण? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बदली होऊनही दप्तर ताब्यात न देणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्यासाठी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा नंदकिशोर मुंदडा यांना उपोषण करावे लागगले. अखेर संबंधित तलाठ्याचे निलंबन करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. नेमके हे काय प्रकरण आहे, जाणून घेऊया... 

अंबाजोगाई (जि. बीड) - तलाठ्याचे निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी लेखी माहिती उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी उपोषणस्थळी दिल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, बुधवारी (ता.पाच) पोलिसांच्या मदतीने तलाठी सजाचे कुलूप उघडून पंचनामा केला असता त्यातील दप्तर गायब असल्याचे निदर्शनास आले. 

बदली झालेल्या तलाठ्यास पुनर्नियुक्ती देऊ नये, नवीन तलाठ्यास दप्तरासह पदभार द्यावा या मागणीसाठी ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा यांनी उपविभागीय कार्यालयासमोर बुधवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या, प्रशासनाने कार्यवाही करत अंबाजोगाई सजाचे कुलूप उघडले; मात्र त्यात कागदपत्रे (दप्तर) हाती लागली नाहीत. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

जानेवारी महिन्यातच तलाठी ए. व्ही. लाड यांची बदली होऊन त्यांच्या जागी सचिन केंद्रे यांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु, बदली होऊनही श्री. लाड यांनी केंद्रे यांच्याकडे दप्तर न सोपविल्याने अनेकांची कामे खोळंबली होती. अखेर सक्तीची कारवाई करून केंद्रे यांच्याकडे दप्तर सोपविण्याचे आदेश द्यावेत, अशी शिफारस तहसीलदारांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तरीही यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने नंदकिशोर मुंदडांनी पूर्वसूचना देऊन उपोषण सुरू केले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

तहसीलदारांनी जमीन महसूल अधिनियमानुसार कार्यवाही करण्यासाठी नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांच्या पथकाला पोलिसांची मदत घेत सजाचे कुलूप काढून, पंचनामा करावा व आतील दप्तर केंद्रे यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पंचनामा झाला; परंतु आतमध्ये दप्तरच आढळले नाही. त्यामुळे पथकाने पंचनामा करून सजा कार्यालय पुन्हा सील केले. 

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले

उपोषणाला जनआंदोलनाचे स्वरूप 
उपोषणस्थळी गुरुवारी नंदकिशोर मुंदडांना पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी झाली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे रस्ताही बंद झाला. एकप्रकारे मुंदडांच्या या उपोषणाला जनआंदोलनाचे स्वरूप आले होते. विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिक यात सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi's Suspension In Beed District