पारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

सर्वदूर दमदार होण्यासाठी लोहारा तालुक्‍यातील तोरंबा येथील प्राचीन दिलालपूर हनुमान मंदिरात सोमवारपासून (ता. 19) नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके धोक्‍यात सापडली आहेत. तर, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अखेरच्या टप्प्यात परतीचा पाऊस सर्वदूर दमदार होण्यासाठी लोहारा तालुक्‍यातील तोरंबा येथील प्राचीन दिलालपूर हनुमान मंदिरात सोमवारपासून (ता. 19) नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

 मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाई कायम स्वरूपी हटू दे, नदी, नाले व तलाव पाण्याने तुडूंब भरावीत, चारा पाण्याअभावी पशुपक्षी व जनावरांचे होणारे हाल थांबून मुबलक चारा उपलब्ध होण्यासाठी उमरगा येथील नवनाथभक्त माधव महाराज सूर्यवंशी यांनी सोमवारपासून तोरंबा येथील प्रसिद्ध प्राचीन दिलालपूर हनुमान मंदिरात सातदिवसीय नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायण सुरू केले आहे.

वरुणराजाला दमदार पावसासाठी साकडे घातले आहे. दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पारायण होत असून रविवारी (ता. 25) दुपारी महाआरतीनंतर प्रसाद वाटपाने सांगता करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about rain