Coronavirus : झेडपी शिक्षकांचे वेतन रखडले 

News About ZP teacher salary late
News About ZP teacher salary late

जालना - लॉकडाऊनमुळे राज्याचे उत्पन्न घटले. त्यामुळे शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात २५ टक्के वेतन होणार आहे; मात्र या धोरणामुळे जिल्ह्यातील जवळपास सात हजार शिक्षकांचे वेतन रखडले आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार शिक्षकांचे वेतन दोन टप्प्यांत होणार आहे; मात्र सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे; तसेच वेतन कसे करायचे? याबाबत स्पष्ट सूचना राज्यस्तरावरून मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या महिन्यात वेतन होण्यास २५ ते ३० दिवस लागू शकतात, अशी परिस्थिती आहे. 
जुन्या पद्धतीने वेतन करायचे झाल्यास (ब्रोकन पद्धती) सर्व शाळा मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, वित्त विभाग असा प्रवास करण्यास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल; मात्र त्याऐवजी चेंज डिटेल पद्धतीने वेतन करण्यास मान्यता मिळाल्यास पुढील ८ ते १० दिवसांत शिक्षकांचे मासिक वेतन होऊ शकते; मात्र या पद्धतीने वेतन केल्यास साधारण दीड हजारापर्यंत वेतन कमी मिळेल; मात्र त्याची भरपाई पुढील उर्वरित पगार करताना होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

देयके आली परत 
शिक्षकांची वेतन देयके ट्रेझरीमध्ये दाखल झाली होती; मात्र शासनाच्या वेतन धोरणामुळे सर्व देयके परत आली आहेत. सर्व वेतन देयके परत आल्यानंतर नव्याने ७५ टक्के प्रमाणे सर्व शिक्षकांची देयके तयार करायची असून, त्यासाठी ब्रोकन प्रेड या पद्धतीचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत; मात्र ब्रोकन प्रेड वेतन प्रणाली राबविल्यास महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेतन होण्याची शक्यता आहे. वेतन अदा करण्यात दिरंगाई होऊ नये म्हणून शिक्षक संघटना कृती समितीने प्रशासनाला निवेदन देऊन मार्च २०२० चे वेतन चेंज डिटेल्स पद्धतीने करण्यात यावे, अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षक संघटना कृती समितीने केली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शिक्षकांचे मार्चचे वेतन दोन टप्प्यांत होणार आहे; मात्र शासनाच्या या धोरणामुळे ७५ टक्के रक्कम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते. म्हणून चेंज डिटेल्स पद्धतीने वेतन केल्यास लवकर वेतन होईल. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे. 
- संतोष राजगुरू, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 

तीन तारखेला शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन केले जातील. सध्या प्रक्रिया सुरू झाली आहे. 
- सुनील पाेलास, अधीक्षक, वेतन पथक, जालना 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com