esakal | एकोणीस नोव्हेंबरला ठरणार उदगीर, जळकोट तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

4sarpanch_20niwad

उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता.१९) रोजी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

एकोणीस नोव्हेंबरला ठरणार उदगीर, जळकोट तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता.१९) रोजी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उदगीर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींची, तर दुपारी तीन वाजता जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

संबंधित गावच्या प्रतिनिधींसमोर या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
उदगीर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायती अंतर्गत प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण, मतदार याद्यांचे काम टाळेबंदीच्या अगोदरच पूर्ण झाले असून टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली असून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत.

त्यानुसार गुरुवारी उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे व जळकोटचे तहसीलदार श्री. कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित गावचे लोकप्रतिनिधींसमोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बिहार व इतर राज्यातल्या निवडणूक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे अनेक ग्रामस्थ या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष ठेवून होते. उदगीर तालुक्यातील आरक्षणाची सोडत कधी होईल. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या ग्रामस्थांची प्रतीक्षा आता संपली असून दिवाळीनंतर लागलीच ही सोडत पूर्ण होणार आहे.संपादन - गणेश पिटेकर