

NHSRC and IAPSM Joint Health Evaluation in Dharashiv
Sakal
येरमाळा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील आरोग्य सेवेचे सर्वंकष मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर (NHSRC), नवी दिल्ली तसेच इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अॅन्ड सोशल मेडिसीन (IAPSM) यांच्या संयुक्त विद्यमाने "महाराष्ट्रातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन" हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.