Latur: डिझेल-पेट्रोल विक्रीचा काळाबाजार जोमात कृत्रिम टंचाईचा फायदा घेत ग्रामीण भागातील प्रकार

Artificial Fuel Shortage Alleged in Nilanga Rural Areas: निलंगा तालुक्यात डिझेल-पेट्रोलचा काळाबाजार वाढल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प झाली असून प्रशासनावर कारवाईची मागणी होत आहे.
Latur

Latur

esakal

Updated on

निलंगा: ग्रामीण भागात सध्या डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. काळाबाजार करणारे कॅन, पिंपात डिझेल, पेट्रोलच्या साठेबाजीला लागले आहेत. गावातील जेसीबी, ट्रॅक्टरचालकांना डिझेल विक्रीचा काळाधंदा सुरू झाला आहे. दुसरीकडे मॉन्सूनपूर्व नांगरणी, कुळवणी, पेरणीपूर्व मशागत आदी कामांसाठी शेतकरी युद्धपातळीवर तयारी करत असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे. औताला बैल मिळेनात, तर पंपावरती डिझेल मिळेना अशी अवस्था झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com