Nilanga Earthquake Scare
esakal
कलांडी गावात भूगर्भातून मोठा आवाज व तीन वेळा झालेल्या आवाजाने गावकरी घाबरले.
तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी लवाजमा घेऊन गावात रात्री जागरण केले.
१९९३ च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणींनी गावकऱ्यांना भयभीत केले.
निलंगा : कलांडी (ता. निलंगा) येथे सोमवारी ता. २९ रोजी रात्री नऊ वाजता भूगर्भातून झालेला मोठा आवाज व त्यानंतर दोन-दोन-तासांनी तीन वेळा झालेल्या आवाजाने भूकंप (Nilanga Earthquake Scare) झाला म्हणून अख्खं गाव भयभीत होऊन रस्त्यावर आलं, ही गोष्ट गावातील प्रतिष्ठितांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी (Tehsildar Prasad Kulkarni) यांच्या कानावर घातली अन् आख्खा लवाजमा घेऊन तहसीलदार गावात हजर झाले अन् गावासोबत पहाटेपर्यंत रात्र जागून काढली. तारीखही ३० सप्टेंबर असल्याने ३२ वर्षांपूर्वीच्या किल्लारी येथील महाप्रलयकारी भूकंपाच्या आठवणी यानिमित्ताने जागा झाल्या.