

Nilanga Municipal Election Postponed After Court Verdict
Sakal
निलंगा : निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात दोन डिसेंबर रोजी मंगळवारी ता. दोन रोजी मतदान होणार असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज बाबत न्यायालयीन निकाल 22 नोव्हेंबर नंतर आला असल्याने निलंगाची निवडणूक होणार की रद्द होणार की होणार याबाबत संभ्रम कायम होता. निवडणुकीसाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती सकाळपासून अधिकारी व कर्मचारी तहसील कार्यालयात मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी बसून होते मात्र 29 नोव्हेंबर रोजीच्या निर्णयामुळे ही निवडणूक रद्द झाली आहे. यामुळे निवडणूक लढवणारे उमेदवाराचा हिरमोड झाला आहे.