

Intense Voting Battle in Nilanga Municipal Elections
Sakal
निलंगा : निलंगा नगरपालिकेत होत असलेल्या अतिशय चुरशीच्या निवडणूकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीत प्रमुख लढत तिरंगी होत असली तरी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरु होती. आकरा प्रभागातून 23 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. चोवीसावा थेट जनतेतून नगराध्यक्ष असणार आहे.