esakal | आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Tahsildar Ganesh Jadhav

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामाचा व्याप प्रशासनातील अधिकाऱ्यांवर वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामात काम करीत निलंगाचे तहसीलदार गणेश जाधव हे शासकीय कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले असताना तब्बल सहा महिन्यानंतर आईवडिलांची भेट घेतली.

आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामाचा व्याप प्रशासनातील अधिकाऱ्यांवर वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामात काम करीत येथील तहसीलदार गणेश जाधव हे शासकीय कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले असताना तब्बल सहा महिन्यानंतर आईवडिलांची भेट घेतली. अन् यावेळी आई म्हणाली कधी डोळे भरून बघावे झाले होते. याबाबतची अधिक माहिती अशी की, सध्या कोरोना संसर्ग शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

वाचा ः उस्मानाबादला होणार नवीन विद्यापीठ, समिती देणार तीन महिन्यात अहवाल

या कोरोना संसर्गामुळे एकमेकांत आपुलकीने सहभागी होणारे नातीही दुरावली जात आहेत. कोरोना संसर्ग दुसऱ्यांना व दुसऱ्यापासून आपल्याला होऊ नये, म्हणून सर्वच स्तरावर काळजी घेतली जात आहे. शासकीय पातळीवर सुद्धा या रोगाच्या जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व हा संसर्ग एकमेकांच्या सहवासातून वाढत असल्यामुळे कडक नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू असल्यामुळे जिल्हाबंदी होती. त्यामुळे अनेकाचा संपर्क यामुळे झाला नाही. प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनाही कोरोना संसर्गाचे विविध कामे असल्यामुळे त्यांना मुख्यालय सोडता आले नाही अथवा त्यांना मूळगावी जाता आले नाही.


निलंगा तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय कोरोना संसर्गाचा प्रसाद शहरासह तालुक्यात वाढत असल्यामुळे येथे प्रशासकीय पातळीवर मोठा ताण वाढला होता. औरंगाबादसह जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग व सारी या महाभयंकर रोगामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धोकादायक जिल्हा असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठा ताण होता. त्यामुळे बहुतांश काळामध्ये संपर्क बंद ठेवण्यात आला होता.अत्यावश्यक सुविधा वगळता कोणालाही एका जिल्ह्यांमधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी परवानगी नव्हती.

हेही वाचा : कृषी आयुक्तालयाचे पथक लातुरात दाखल, विभागातील बदल्यांची चौकशी सुरु

त्यामुळे टाळेबंदीचा काळ कडक पाळण्यात आला होता. औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनाचा संसर्गामुळे येथील तहसीलदार गणेश जाधव यांनाही प्रतिक्षा करावी लागली. औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या कामानिमित्त येथील श्री.जाधव दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांनी आपल्या आई-वडिलांची शासकीय कामानिमित्त गेले असताना भेट घेतली. या प्रसंगी आई म्हणाली, कि किती दिवसाने भेट झाली.

डोळे भरुन पाहावे वाटले असे म्हणताच तहसीलदार गणेश जाधव भाऊक काय झाले. तब्बल सहा महिन्यानंतर आपल्या आई-वडिलांना पाहून त्यांना आपल्या अश्रू अनावर झाले. कोरोना संसर्गाची एक ना अनेक संकटे समोर येत आहे. यानिमित्ताने अनेक नाती दुरावली जात आहेत. त्यातच शासकीय कामानिमित्त आपल्या आई वडिलांची भेट तहसीलदार यांनी घेऊन आल्यामुळे एक वेगळे समाधान झाले असल्याचे बोलले जात आहे.

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top