

Arvind Patil Nilangekar Wins First Election by Defeating Sangita Patil Nilangekar in Latur District Central Cooperative Bank Polls
esakal
निलंगा : निलंगा विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील सहकारी संस्था मध्ये प्राबल्य असलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्हा बँक निवडणूकीच्या माध्यमातून एक प्रकारे भाजपाने परिवर्तन पॅनलच्या तिन्ही जागा जिंकून सुरुंग लावला आहे. माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर याना 64 मते तर त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांना 32 मते मिळाली निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशा झालेल्या लढतीत 32 मतानी अरविंद पाटील यांचा विजयी होत बँकेत दमदार एन्ट्री केली. शिवाय देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यात भापाची सरशी झाल्याने निलंग्यात भाजप कार्यकर्त्यांचा गुलाल, मिठाई अन् फटाक्यांनी जल्लोष साजरा केला.