पुलावरील कठड्यावर तवेरा धडकल्याने नऊ वारकरी जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पुलावरील कठड्यावर तवेरा धडकल्याने नऊ वारकरी किरकोळ जखमी झाले. देहू-आळंदी येथे दर्शनासाठी हे वारकरी तवेरामधून निघाले होते.

वाशी (जि. उस्मानाबाद) : पुलावरील कठड्यावर तवेरा धडकल्याने नऊ वारकरी किरकोळ जखमी झाले. देहू-आळंदी येथे दर्शनासाठी हे वारकरी तवेरामधून निघाले होते. सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्‍यातील पारगावजवळ असताना गुरुवारी (ता.21) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

चालकाचे नियंत्रण सुटले
वाणेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील वारकरी देहू, आळंदीकडे तवेरामधून (एमएच-25, ए-2389) निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते पारगाव येथून पुढे जात होते. यावेळी पारगावजवळील एका पुलावर असताना एका टायरमधील हवा अचानक पूर्णपणे गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलावरील कठड्यावर जाऊन आदळले. या अपघातात नऊ वारकरी जखमी झाले. त्यांच्यावर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पाठविण्यात आले.

कशामुळे - उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध औरंगाबादेत तक्रार दाखल

जखमी वारकऱ्यांची नावे

पांडुरंग मन्मथ उंबरे (वय 70), दयानंद भीमराव जाधव (50), बळीराम गुटुकडे (70), रुक्‍मिणी पांडुरंग उंबरे (65), राधा बळीराम गुटुकडे (62), कमल महारुद्र उंबरे (75), निर्मला मारुती गाढवे (70), सुमन सीताराम कदम (60), काशीबाई हरिदास हावळे (65, सर्व रा. वाणेवाडी, ता.उस्मानाबाद). हे वारकरी कपिलधार (ता. बीड) येथे दर्शन घेऊन पुढे देहू-आळंदी येथे दर्शनासाठी जाणार होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Warkari were injured in the accident