MLA Sanjana Jadhav and Nitesh Rane
sakal
कन्नड - मच्छीमार व्यवसायाला शासनाने शेतीचा दर्जा दिला असून, त्याच दृष्टिकोनातून मच्छीमारांसाठी काही शासन निर्णय (जीआर) काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी व विविध सवलती दिल्या जातील, त्याच धर्तीवर मच्छीमारांनाही सवलती देण्यात येतील, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी (ता. २८) दिले.