बा... विठ्ठला.... रेल्वेला सदबुध्दी दिलीस रे....!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी निझामाबाद – पंढरपूर ही पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने ता. 16 जून ते ता. 7 जूलै आणि पंढरपूर - निजामाबाद ही गाडी ता. 15. जून ते ता. 05 जूलै दरम्यान रद्द करण्यात आली होती.

परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली.

विठ्ठलानेच परत रेल्वे प्रशासनास ही सदबुध्दी दिल्याची समाधानकारक प्रतिक्रिया हजारो विठ्ठल भक्तामधून व्यक्त होत होती.

सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी निझामाबाद – पंढरपूर ही पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने ता. 16 जून ते ता. 7 जूलै आणि पंढरपूर - निजामाबाद ही गाडी ता. 15. जून ते ता. 05 जूलै दरम्यान रद्द करण्यात आली होती.

परंतु, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा फटका आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना बसणार होता. या संदर्भात सकाळने मंगळवारी (ता.18) च्या अंकामधून पंढरपूर रेल्वेचा बळी आषाढीलाच ?  या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. तसेच रेल्वे प्रवाशी संघटनानी देखील यावर आवाज उठविला होता. त्यामुळे ही गाडी ता. 22 जून ते 7 जुलै दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहे. म्हणजेच पंढपूर येथे जाण्याकरिता प्रवाशांना आता ता. 22 जून ते ता. 15 जुलै दरम्यान निझामाबाद-पंढरपूर सवारी गाडी उपलब्ध झाली आहे.

तसेच पंढरपूर - निझामाबाद ही गाडी ता. 23 जून ते 15 जुलै दरम्यान पुन्हा नियमित धावेल असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizamabad to Pandharpur railway starts again