Bharat Band Updates : परळीत कडकडीत बंद, महाविकास आघाडीच्या वतीने दुचाकी फेरी

प्रविण फुटके
Tuesday, 8 December 2020

दिल्ली सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने परळी शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : दिल्ली सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने परळी शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेला बंदला येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता.आठ) सकाळी दुचाकी फेरी काढून दुकाने बंद करण्याची विनंती करण्यात आली. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून दुचाकी फेरीस सुरुवात करुन गणेशपार, अंबेवेस, नेहरू चौक, पोलिस ठाणे, आझाद चौक, शिवाजी चौक, स्टेशन रस्ता मार्गे राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात येऊन आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या समर्थनात भाषणे करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहूजन आघाडी, शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंदसाठी शहरात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वतीने दुचाकी फेरी काढण्यात आली. या दुचाकी फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुफळी पडली असून याचे पडसाद या दुचाकी फेरी मध्ये दिसून आली. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांचा एक गट व इतर नगरसेवकांचा एक गट दिसून आला.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Activity In Support Of Bharat Bandh Parli Beed News