
दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी (ता.आठ)देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात औरंगाबाद येथील बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद ठेवला आहे.
औरंगाबाद : दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी (ता.आठ)देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात औरंगाबाद येथील बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद ठेवला आहे. ते भाजी मंडईमध्ये जाणवला नियमित येणारे शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन ते तीन टक्केच फळभाजीपाला विक्रेते रस्त्यावर दिसले. जवळपास साडेनऊ वाजेपर्यंत ही गर्दी दिसून आली. त्यानंतर भाजीमंडईत आलेली किरकोळ विक्रेत्यांनीही भाजी मंडईतून परत गेले.
बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत किराणासह भाजीपाला मार्केटमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या भारत बंदचा परिणाम थेट सर्व व्यवहारावर जाणवला. बाजार समितीत पहाटे दोन वाजेपासून जिल्ह्यात परत जिल्ह्यातून शेतमाल भाजीपाला धान्य विक्रीसाठी येतात. मात्र भारत बंद असल्यामुळे काल पासून एकही वाहन बाजार समितीत दाखल झाले नाही. नियमित हजारो क्विंटल आणि येणारा धान्य भाजीपाला, फळे याची केवळ एक ते दोन गोणी आवक झाल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी साडेआठनंतर बाजार समितीत शुकशुकाट
शहरात किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी हातगाडीवर विक्रीसाठी भाजीपाला व फळांची खरेदी करून माघारी परतले. शहर परिसरातील काही गावातील शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. मात्र ग्राहकच नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. भाजीमंडईमध्ये नियमित असणारी गर्दीच्या तुलनेत केवळ दोन ते पाच टक्केच लोक दिसून आले. सकाळी साडेआठ नंतर भाजी मंडई येथील सर्व छोटे-मोठे व्यापारी माघारी परतल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
संपादन - गणेश पिटेकर