Beed News: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाला दीड वर्ष उलटले, तरीही आरोपींच्या अटकेत कोणतीही प्रगती झालेली नाही. बाळा बांगर याचा तब्बल सहा तास जबाब नोंदवण्यात आल्यानंतर तपासाला पुन्हा गती मिळत आहे.
बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेला दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानाही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.