महाजनादेश यात्रेमुळे दिवसभर वीज गुल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमुळे
दिवसभर सिल्लोड शहरातील वीज गुल झाल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास
सहन करावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बुधवारी (ता. 28) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची शहरात जोरदार तयारी सुरू
असताना यात्रेच्या मार्गावरील वीजतारांमुळे कुठलीही विपरीत घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वीजपुरवठा बंद करून या मार्गावरील सर्व विजेच्या तारा काढून घेतल्या होत्या.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमुळे
दिवसभर सिल्लोड शहरातील वीज गुल झाल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास
सहन करावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बुधवारी (ता. 28) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची शहरात जोरदार तयारी सुरू
असताना यात्रेच्या मार्गावरील वीजतारांमुळे कुठलीही विपरीत घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वीजपुरवठा बंद करून या मार्गावरील सर्व विजेच्या तारा काढून घेतल्या होत्या.

यामुळे सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सातपर्यंत शहराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. बालरुग्णालयातील बालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या पालकांनी व्यक्त केली. यात्रेच्या समारोपानंतर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या ताफ्यासह युद्धपातळीवर वीजजोडणीची मोहीम हाती घेतली खरी; परंतु संध्याकाळी सातपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Electricity Due To Mahajanadesh Yatra