esakal | एकही व्यक्ती पंचनाम्यातून वंचित राहणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

beed

एकही व्यक्ती पंचनाम्यातून वंचित राहणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड, ता. १ : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनाम्यांचे काम वेगात सुरु आहे. गुरुवार (ता. ३०) पर्यंत ९२ टक्क्यांपर्यंत पंचनामे झाले. मात्र, पंचनामे करताना नुकसान झालेला एकही शेतकरी त्यातून वंचित राहिला नको याची काळजी प्रशासन घेत आहे. त्यामुळे पंचनाम्यांची पडताळणी केली जात आहे, एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यांतून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

श्री. शर्मा यांनी शुक्रवारी (ता. एक) ‘सकाळ’वशी संवाद साधला. सुरुवातीला ऑगस्ट अखेर अतिवृष्टी झाल्यानंतर पंचमाने सुरु करताच पुन्हा ता. चार ते सात या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे नव्याने पंचनामे करावे लागले. त्यानंतर पंचनामे करताच पुन्हा अतिवृष्टी झाली. त्यामुळे प्रशासन सतर्क असून पंचनामे करताना सर्व काळजी घेतली जात आहे. शेती पिकांच्या नुकसानीसह पुरामुळे जनावरेही दगावली. खरडून गेलेल्या जमिनी, पडलेली घरे, मृत व्यक्तींची इत्थंभूत माहिती गोळा केली जात आहे. मृतांपैकी १३ व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासन मदत दिल्याचेही राधाबिनोद शर्मा यांनी नमूद केले. अगोदरच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे करताना त्यातून कोणी वंचित राहिला नको याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शासन, पालकमंत्री, आयुक्त यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे असेही ते म्हणाले.

loading image
go to top