पाचोड - पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावूनही पैठण तालुक्यात पावसाळ्यात पाणीटंचाईने टँकरवरच भिस्त ठेवण्यास भाग पाडले असून कोट्यावधी रुपये खर्चुन कार्यान्वित केलेल्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत..सत्तर गावात पाण्याचे 'दूर्भिक्ष्य' निर्माण होऊन या गावांतील एक लाख २९ हजार ४९४ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७१ टँकर सुरु ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.त्यामुळे धरणाकाठच्या नागरिकांवर 'धरण उशाला अन कोरड घशाला' असे म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याचे चित्र पाहवयास मिळते..सन २०२० ते सन २०२३ पर्यंतचा अपवाद वगळता पैठण तालुक्यात पाणीटंचाईने आपला टँकरचा आलेख कायम राखला. पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोमदार हजेरी लावली अन् टँकर बंद होण्याची आस बळावली. मात्र विहीरीच्या जलसाठ्यात वाढ न झाल्याने पावसाळ्यात ही टँकरने पाठ सोडलेली नाही.पावसाळा सुरु झाला असला तरी पावसाळ्यात ७० गावांतील नागरिकांना टँकरवरच अवलंबुन राहवे लागत आहे. एकतुनी, खेर्डा, दावरवाडी हे लघुप्रकल्प सलगरित्या कोरडेच आहेत. सर्व बुडीतक्षेत्र वेडया बाभळी व बेशरमाच्या झाडांनी वेढले गेले. या प्रकल्पातील बारा गावांच्या कोट्यावधी रुपये खर्चाच्या कार्यान्वित पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्या..जूनपूर्वी १८८ पैकी ६८ गावांस ७० टँकरने पाणी पुरविण्यात आले. मात्र जुनमध्ये पावसाने हजेरी न लावल्याने आणखी टँकरच्या संख्येत वाढ होऊन आता ७० गावांना ७१ टँकरच्या ११६ खेपाद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.सर्व उदभव कोरडे असल्याने टॅंकर भरण्यासाठी ४० ते ११० किलोमीटर अंतर कापून मुधलवाडी पाँईट,फारोळा व खोडेगाव पाँईटवर टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून दिवसभरात हे टॅंकर ७० गावातील एक लाख २९ हजार ४९४ लोकांची तहान भागवित आहे. तर चिंचाळा शिवारात तीन गावासाठी पाच विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.टॅकर सुरू असलेल्या गांवात ग्रामस्थ टँकरच्या प्रतिक्षेत ड्रम, नळ्या हातात घेऊन उभे असल्याचे दिसून येते. एकंदरीत भर पावसाळ्यात त्यांची पाण्यासाठी प्रतिक्षा पाणीटंचाईची तिव्रता लक्षात आणून देते..टँकर सुरु असलेली गावे -आडुळ बु॥, आडूळ तांडा, खडकीतांडा, सुंदरवाडी तांडा, दोरखेडा, तांडा खु, तांडा बु, तुपेवाडी तांडा, कूतूबखेडा, थेरगाव, हर्षी बु॥, हर्षी खूर्द, पारूंडी, खादगाव, यासीनपूर, जांभळी, लिंबगाव, दरेगाव, मिरखेडा, चौढाळा, लाखेगाव, दादेगाव बु॥, दादेगाव खूर्द, मुरमा, कोळी बोडखा ,कडेठाण बु॥, कडेठाण तांडा, मेहरबान तांडा. वरुडी बु॥, सोमपुरी, रांजणी, पोरगाव, पाडळीतांडा, रांजनगाव खूरी, बोकुड जळगाव, पाटोदे वडगाव, खंडेवाडी, बल्लाळपूर, नायगव्हाण, केकत जळगाव, अब्दुल्लापूर, सुलतानपूर, आडुळ खूर्द, खंडाळा,नानेगाव, रांजनगाव दांडगा, सानपवाडी, यासीनपुर, सोनवाडी बु॥, सोनवाडी खु॥, टेकडी तांडा..टँकर भरण्याच्या ठिकाणात हेराफेरी -पैठण तालुक्यात सर्व उद्भभव कोरडे असल्याचे दाखवून सर्व टँकर मुद्दलवाडी, फारोळा व खोडेगाव येथून भरण्याचे नियोजन करण्यात येऊन टँकर मालकाला त्यांच्या ठरवून दिलेल्या उपरोक्त पाँईटच्या अंतराप्रमाणे इंधन व मोबदला दिला जातो..मात्र सहज फेरफटका मारल्यास सदरील टँकर गावशिवारातच भरले जात असल्याचे पाहवयास मिळते. या टँकरला न जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली न कोणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासणीची कधी तसदी घेतली. टँकरच्या खेपा, अंतर व क्षमता यांत मोठे गौडबंगाल असल्याचे सांगितले जाते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.