केज शहरात वाल्मीक कराड याने हंसराज देशमुख (Hansraj Deshmukh) यांच्याकडून जागा विकत घेतली होती. त्या जागेत देशी-विदेशी दारू (वाईनशॉप) विक्रीचे दुकान काढण्यासाठी नगर पंचायतकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती.
केज : खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad) याला देशी-विदेशी दारू विक्रीचे दुकान (वाईनशॉप) काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र केज नगरपंचायतीने (Kaij Nagar Panchayat) रद्द (Wine Shop license Cancelled) केल्याची माहिती आज, बुधवारी (ता. १५) नगराध्यक्षा सीता बनसोड व गटनेते हारूण इनामदार यांनी दिली आहे.