लातूर शहरासह जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

Unseasonal Rain Latur  City And District
Unseasonal Rain Latur City And District

लातूर  ः लातूर परिसरात बुधवारी (ता.१८) रात्री विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शहरात काही भागात विजेचा लपंडावही पाहायला मिळाला. गेल्या दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उकाडा निर्माण झाला होता. पण बुधवारी दुपारपासून मात्र वातावरणात बदल झाला. दुपारी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. तसेच वारेही सुटले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास मात्र वीजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली.

औसा परिसरातही सायंकाळी सातच्या सुमारास अर्धा तास विजेच्या कडकडाटसह पाऊस पडला आहे. बेलकुंड येथे रिमझिम पाऊस झाला. जळकोट तालुक्यातही रिमझिम पाऊस झाला आहे. पानगाव (ता.रेणापूर) परिसरात पाऊन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे ग्रामस्थांची मात्र तारांबळ उडाली. नळेगाव परिसरात ढगाळ वातावरण राहिले. तांदूळजा (ता.लातूर) भागात दुपारी चारपासून मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला. रोहिणा परिसरात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. जानवळ (ता. चाकूर) येथे वादळी वाऱय़ासह पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कासारशिरसी, अहदमपूर, किल्लारी, उजनी परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण होते.

वाचा ः विदेशातून आला म्हणून पाठवले दवाखान्यात, लातूर जिल्ह्यातील घटना

उदगीर
उदगीर ः शहर व परिसरात बुधवारी (ता.18) सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह बेमोसमी पावसाने थैमान घातले. या पावसाने तालुक्यातील ज्वारी, हरभरा, तुर, द्राक्षासह टमाटे, काकडी, टरबूज, दोडका, पपई आदी भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

औशासह परिसर
औसा ः शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाडा जाणवत असलेल्या औसेकरांना थोडासा थंडावा जरी मिळाला असला तरी रब्बी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जळकोट भागात सरी
जळकोट ः शहर व परिसरात आज दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण झाले. साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही काळ सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाळी. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी गोविंद केंद्रे बोरगावकर या शेतकऱ्याने तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

पानगाव परिसरात मुसळधार
रेणापूर ः तालुक्यातील पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, गोविंदनगर, चुकारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, मुसळेवाडी, नरवटवाडी आदी गावांत दुपारी तीनच्या सुमारास काही काळ सरी कोसळल्या. त्यानंतर साडेचारच्या सुमारास पुन्हा वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. गहू काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. हरभऱ्याचे ढीग भिजले. उभी ज्वारी भुईसपाट झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com