
लातूर : कायदा हातात घेऊ नका. सलून सुरू करून स्वतःला व ग्राहकांना फौजदारी गुन्ह्यात अडकवू नका, असा सल्ला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सलून व्यावसायिकांना दिला आहे. दहा जूनपासून सलुन सुरू ठेवण्याची परवानगी न दिल्यास ता.१५ जूनपासून ते सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळाने दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. सलुन व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाचव्या टाळेबंदीमध्ये अर्थात टाळे उघडीण एकमध्ये अनेक व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, सलुन व्यवसायावरील बंदी कायम ठेवली आहे. यामुळे सलून व्यावसायिकांची उपासमार होत आहे. यातून पारंपारिक व्यवसायाचा अपमान झाला असून नियम व अटी घालून व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे. दहा जूनपासून परवानगी न दिल्यास ता.१५ जूनपासून दुकाने उघडण्याचाही इशारा महामंडळाने दिला होता. यावर मंगळवारी (ता.नऊ) फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारचा दिशानिर्देशानुसार सलुन बंद ठेवण्यात आले आहेत. सलून व्यावसायिकांच्या संवेदना मी समजू शकतो. मात्र, व्यवसाय बंद करण्यामागील राज्य सरकारचा उद्देश सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. काही व्यावसायिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करून सलुन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्लॅन) सादर केला असून तो सरकारकडे पाठवला आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतर सलुन सुरू करता येतील. टाळेबंदी चारमध्ये सलुन सुरू करण्यास परवागनी दिली होती. आता टाळे उघडणी एकमध्ये सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी लागेल. मी स्वतः या विषयावर वरिष्ठांसोबत चर्चा करत आहे. या स्थितीत व्यवसाय सुरू केल्यास तुमच्याविरूद्ध व ग्राहकांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.