...तो वाघ नाही तर निघाला तरस 

विलास शिंदे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

वनविभागातील ठसे तज्ञांनी खुलासा केला. तरस असल्याची खात्री पटल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक हे साळेगाव (ता.सेलू) येथून निघून गेले. मात्र, वनपाल गणेश घुगे हे मात्र, त्या तरसाला पकडण्यासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

सेलू (जि.परभणी) : साळेगाव (ता.सेलू) शिवारात सोमवारी (ता.नऊ) सायंकाळच्या सुमारास काही नागरीकांना रस्त्याच्याकडेल वाघ दिसल्याची चर्चा झाली होती. त्यानुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळी तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्यासह पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी वाघ दिसला त्या ठिकाणी  प्रत्यक्ष पाहणी करत नागरीकांना शांततेचे अवाहन करत वनविभागातील ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी घटनास्थळी जाऊन पायाचे ठस्याची पाहणी केली असता ते ठस्से तरसाचे असल्याचा दुजोरा दिला.

पशुधनांची शेतकऱ्यांनी  काळजी घ्या
या वेळी वनविभागातील तज्ञांनी शेतकऱ्यांनी भयभित न होता. शांतेत राहण्याचे व अफवावर विश्वास ठेवु नये, असे अवाहन केले. तसेच शेतात असलेल्या पशुधनांची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कोणाच्या शेतात जर पशुधनावर या प्राण्याने जर हल्ला केला असेल तर तशी माहिती तत्काळ तहसीलदार बालाजी शेवाळे यांना द्यावी, असे अवाहन या वेळी त्यांनी केले. घटनास्थळी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी विजय सातपुते, वनपाल गणेश घुगे, श्री. भंडारे यांनी परिसरातील शेतात जावुन पावलांचे ठस्से पाहीले तसेच या ठिकाणी तरसाची विष्ठा देखील मिळुन आली असल्याने हा प्राणी तरसच असल्याचा दावा वनअधिकारी यांनी केला आहे.

हेही वाचा - आता कांदा मिळणार ‘रेशन’वर !  

कर्तव्यदक्ष तहसीलदार....
साळेगाव (ता.सेलू) शिवारात सोमवारी सायंकाळी वाघ दिसल्याची चर्चा झाल्यानंतर परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले होते. ही माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांना मिळाल्यानंतर क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली ते एवढ्यावर न थांबता नागरीकांना एकत्र घेत भिती बाळगण्याचे कारण नाही. वाघ जर असेल तर निश्चित त्याला पकडून वनविभागाच्या हवाली करण्याची ग्वाही दिली. साळेगाव व रायपुर येथील नागरीकांशी चर्चा करत वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत घटनास्थाळावर थांबून रात्री साडेबारा वाजता ठस्सेतज्ञांनी हे ठस्से वाघाचे किंवा बिबट्याचे नसून हे तरसाचे असल्याचा दुजोरा दिल्यानंतरच त्यांनी नागरीकांना घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगुन ते रात्री एक वाजेच्या सुमारास तहसीलदार शेवाळे सेलूकडे रवाना झाले. या घटनेवरून तहसीलदार हे किती कर्तव्यदक्ष व नागरीकांची काळजी घेणारे असल्याची चर्चा यावेळी नागरिकातून होत होती.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यातील साळेगाव शिवारात वाघ..!

वनपाल तळ ठोकून...
साळेगाव (ता.सेलू) शिवारात सोमवारी सायंकाळी वाघ दिसला असल्याची नागरिकात चर्चा झाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. पायाच्या ठस्यावरून व त्याच्या विष्ठेवरून तो वाघ नसून तरस असल्याची खात्री पटल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक हे तेथून निघून गेले. मात्र, वनपाल  गणेश घुगे हे मात्र, त्या तरसाला पकडण्यासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

हेही वाचा - गंगाखेडला व्यापाऱ्याचे अडीच लाख लांबविले...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... not a tiger, but a departure