‘कोरोना’ कवच स्थापन करण्यास असहकार्य, ग्राम सेवकाला नोटीस

विनोद आपटे
सोमवार, 20 एप्रिल 2020

मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या लखामापूर येथे राज्य सरकारने दिलेल्या या आदेशाचे पालन करण्यासाठी सोमवारी (ता.२०) रोजी तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांनी तेथील ग्राम सेवक हाणमंत हाळदे यांना अॕँटी कोरोना कवच स्थापन करण्यासाठी गावात येण्याची विनंती केली. पण ग्राम सेवकाने गावात येण्यास साफ नकार देऊन शासनाच्याच आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. तर राज्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला असताना यावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत असताना मात्र शासनाच्याच आदेशाला त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून हारताळ फासली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   राज्य सरकारने गाव तिथे अॕँटी कोरोना कवच स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. मुखेड तालुक्यातील लखमापूर येथील ग्राम सेवकांनी अँटी कोरोना कवच स्थापन करण्यास असहकार्य केल्यामुळे तहसिलदारांनी त्यांना स्वतः हजर राहून कारणे द्या नोटीस बजावली आहे.

हेही पाहा -  Video : खेळ मांडियेला...नेते लागले श्रेय लाटण्याच्या तयारीला

मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या लखामापूर येथे राज्य सरकारने दिलेल्या या आदेशाचे पालन करण्यासाठी सोमवारी (ता.२०) रोजी तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांनी तेथील ग्राम सेवक हाणमंत हाळदे यांना अॕँटी कोरोना कवच स्थापन करण्यासाठी गावात येण्याची विनंती केली. पण ग्राम सेवकाने गावात येण्यास साफ नकार देऊन शासनाच्याच आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. तर राज्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला असताना यावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत असताना मात्र शासनाच्याच आदेशाला त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून हारताळ फासली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

कोरोना कवचची स्थापना करण्यास असमर्थता
सर्वत्र लॉकडाऊन असतानाही अनेक मार्गाने लोकही आपआपल्या गावात परत येत असलेल्या लोकांचा सर्व्हे करून त्यांची  वैद्यकीय तपासणी करून घेणे व त्यांना विलगीकरण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे, यासाठी कोरोना कवच फारच  महत्त्वाचे आहे. गाव तिथे याची स्थापना झाली तरच गावात होणारा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबणार आहे. पण येथील ग्रामसेवक हाणमंत हाळदे यांनी लखमापूर येथे  कोरोना कवचची स्थापना करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी २४ तासांच्या आत कारणे दाखवा नोटीस दिली अन्यथा कारवाईला तयार राहा अशी नोटीस बजावली आहे.

ग्रामिण भागात कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने गाव तिथे  कोरोना कवचची स्थापना करण्याचे कडक आदेश दिले असून या आदेशाचे पालन करण्यासाठी तेथील ग्राम सेवक हाणमंत हाळदे यांना मी गावात बोलावले पण त्यांनी येण्यास साफ नकार दिल्यामुळे लखमापूर येथे कोरोना कवचची स्थापना अजूनही झालेली नसून यांची माहिती वरिष्ठांना कळविली आहे.
- ज्ञानेश्वर रातोळीकर, तलाठी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to village servant, unable to establish 'corona' armor, nanded news