आता परभणीच्या सुरक्षेत वाढ !

NND20A96172_org.JPG
NND20A96172_org.JPG


परभणी : शेजारील हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परभणी जिल्हा प्रशासनाने शहराच्या सुरक्षेत वाढ केली. लोकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून आता शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व गल्लीबोळांचे व कॉलन्यांचे रस्ते बंद करण्यास सुरवात केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाउनमुळे संपूर्ण शहर बंद आहे. त्याच बरोबर शहरात संचारबंदीदेखील लावण्यात आली आहे. परंतु, संचारबंदीच्या काळात अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत होते. त्यामुळे सुरवातीच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून पाहिला. त्यानंतर अशा लोकांवर कारवाईही करण्यात आली आहे. यानंतरही अनेक लोक रस्त्यावर फिरतांना दिसत होते. त्यामुळे पोलिसांची डोके दुखी वाढली होती. त्यातच जिल्ह्याच्या लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच कॉलनीच्यादेखील बाहेर पडू नये यासाठी आता शहरातील मुख्य रस्त्यावर येणारे सर्व रस्ते लाकडे लावून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व कॉलन्यातील व गल्ली बोळांचे रस्ते लाकडे लावून बंद करण्यात आले आहेत.

२१५ जण संशयित दाखल
परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसतानाही मात्र, संशयित रुग्णांच्या संख्येत झापट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. दोन) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात २१५ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. १२९ रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहेत. हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य कक्षात ४४ जण आहेत. ४२ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. परदेशातून आलेले ६१, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांवर आरोग्य पथकाची नोंद करण्यात आली आहे.

 


२७ जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला
कोरोना विषाणुच्या संदर्भात तपासणीसाठी २७ संशयीतांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.दोन) दिवसभरात २७ संशयीत रुग्ण दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com