esakal | नांदेडमध्ये आता महिला डाक कार्यालय
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

नांदेड येथील अशोकनगर येथे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या प्रयत्नाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला डाक कार्यालयाचे उद्घाटन अध्यापक विद्यालयाच्या प्रा. डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेडमध्ये आता महिला डाक कार्यालय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : केंद्र सरकारने देशातील महिला डाक कार्यालय सुरू करण्याचे संकेत नुकतेच दिल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. गुरु गोविंदसिंग यांची पवित्र भूमी असलेल्या नांदेड येथील अशोकनगर येथे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या प्रयत्नाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला डाक कार्यालयाचे उद्घाटन अध्यापक विद्यालयाच्या प्रा. डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुनंदा रोडगे म्हणाल्या की, सामाजिक जाणिवा बदल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही. परंपरापासून जे विचार आहेत ते बदलले पाहिजे. मुलां- मुलींमधील मतभेद आहेत ते आपल्या घरातूनच दूर केले पाहिजे. महिला पूर्वी काचेचे भांडे होते आता ते लोखंडी भांडे झाले आहे ते कधीही फुटणारे नाही.
महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यात आव्वल आहेत. आज महिला देशाच्या सिमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. एवढेच नव्हेतर आकाशात झेप घेऊन पुरुषापेक्षा दोन पाऊल पुढे गेले आहेत. तसेच पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या टपाल खात्यावर आजपण देशाच्या नागरिकांचा विश्वास आहे.

हेही वाचाWomens day : तुमची सुरक्षा माझी जबाबदारी- अशोक चव्हाण

मुख्य डाक कार्यालयात सर्व सुविधा 

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत बोलतांना म्हणाले की, आजपण ग्रामीण भागातील टपाल कार्यालय व शहरी भागातील टपाल कार्यालयामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील आदिवासी व दुर्मिळ भागात महिला पोस्टमन व पोस्ट मास्तर हे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत तसेच
पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट, वित्त विभागामध्ये पण महत्वाच्या पदावर महिलांची निवड डाक विभागाने केली आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

सुकन्या समृध्दी खाते योजना विशेष मोहीम

डाक विभागात जनकल्याण योजना जनतेच्या दारापर्येंत पोहचण्यासाठी आम्हीं प्रयत्न करीत आहोत. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महिला दिनानिमित्त जिल्ह्यात व मुख्य टपाल कार्यालयामध्ये मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे अहवान डाक अधीक्षक श्री. लिंगायत यांनी केले आहे.

महिला कर्मचारी पहिले मानकरी

सहाय्यक डाक अधीक्षक संजय आंबेकर यांनी महिला पोस्ट ऑफिस संदर्भात प्रथम माहिती दिली तर  महिला पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून अर्चना आहेर यांना मिळाला आहे. सहाय्यक पोस्ट मास्तर सोनी कांबळे यांना मिळाला आहे. डाक सेवक पदावर महानंदा देवणे हे काम पहाणार असल्याचे डाक अधीक्षक यांनी सांगितले.

येथे क्लिक करामहापालिकेचा ६४५ कोटींचा अर्थसंकल्प, कोणत्या ते वाचा...

यांची होती उपस्थिती

सूत्रसंचालन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहाय्यक प्रबंधक अरुण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक डाक अधीक्षक मनीष नवंलु यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सरिता गुजराथी डाक वित विभाग, वर्षा जाधव, माया देशमुख, अर्चना चवडेकर, किरण डांगे भोसीकर, सोनी कांबळे, अर्चना आहेर, ज्योती कांबळे, पूनम लोखंडे, श्रीमती भोसीकर, महिला प्रधान एजन्ट व अशोकनगर भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच मुख्य पोस्ट मास्टर डी. एम. जाधव, डॉ. भगवान नागरगोजे, संजय आंबेकर, राजेंद्र मगणाले, अरुण गायकवाड, डाक विभागाचे विपणन आधिकारी सुरेश सिंगेवार, एम. बी. माकोडे, पी. के. आदी उपस्थित होते.