esakal | Womens day : तुमची सुरक्षा माझी जबाबदारी- अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

अप्रवृतीला आळा घालून त्यांना दिशा देण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. ती शक्ती जागृत ठेवून समाजात निर्भयपणे वावरा असे आवाहन करत तुमची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे असे मत पालकमंत्री अशोक चव्हाण

Womens day : तुमची सुरक्षा माझी जबाबदारी- अशोक चव्हाण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महिलांवर अत्याचार करणाऱ्या अप्रवृतीला आळा घालून त्यांना दिशा देण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. ती शक्ती जागृत ठेवून समाजात निर्भयपणे वावरा असे आवाहन करत तुमची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे असे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजीत केलेल्या निर्भया वॉकच्या समारोपप्रसंगी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या प्रांगणात रविवारी (ता. आठ) मार्च रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी कौटुंबीक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मंघाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षा धबाले, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहण हंबर्डे, माजी आमदार डी. पी. सावंत, कुलगूरु डॉ. उद्धव भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, उपमहापौर सतीश देशमुख, डॉ. शोभा वाघमारे, प्रकाशकौर खालसा, शशिकला बेटमोगरेकर यांची विचारपिठावर उपस्थिती होती. 

हेही वाचाफौजदार ‘रुपाली’ यांचा साहसी प्रवास

जिल्ह्यातील चुकीच्या गोष्टीला थारा देऊ नका. 

पुढे बोलतांना श्री. चव्हाण म्हणाले की, महिलांर होणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. देश, राज्य व जिल्हाभरात महिलांवरील होणारे अत्याचार थांबले पाहिजे. समाजाची विक्ती याला कारणीभूत असून त्या विक्तीला जागीच ठेचले पाहिजे. पोलिस विभागांनी अशा प्रकरणात सक्त कारवाई करून गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी. जिल्ह्यात शांतता प्रस्थापीत करायची असेल तर अगोदर अवैध धंदे बंद करायला पाहिजे. कारण अवैध धंद्यातून येणारा पैसा हा अवैध मार्गाला जातो. जिल्ह्यातील चुकीच्या गोष्टीला थारा देऊ नका. महिलां व मुलींसाठी सक्त कायदे आहेत त्याची अमलबजावणी निट झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी त्यांनी उपस्थित महिला, विद्यार्थीनीना सुरक्षा पेनचे वाटप करण्यात आले. 

महिलांचा सन्मान नेहमीच करा- न्या. चव्हाण

न्यायाधीश स्वाती चव्हाण म्हणाल्या की, आपल्या देशाचे कायदे सर्वात चांगले आहेत. त्यासाठी कायद्याला दोष न देता त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. आज देशातील किंवा राज्यातील सत्तर वर्ष ते दोन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. ही बाब गंभीर आहे. महिलादिन एक दिवसाचा साजरा न करता महिलांचा सन्मान नेहमीच करा असे आवाहन न्या. चव्हाण यांनी केले.

येथे क्लिक करा सासुचे सुनेसोबत घृणास्पद कृत्य
 
पहिल्यांदाच महिला पोलिस दंगा नियंत्रण पथक

प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पहिल्यांदाच महिला पोलिस दंगा नियंत्रण पथक कार्यरत केले असून छेडछाडीवर नियंत्रण मिळविले आहे. आपल्यावर होणारा अत्याचार मुलींनी लगेच आपल्या नातेवाईकाला किंवा पोलिसांना सांगितला तर वेळेवर त्याचा प्रतिबंध करता येईल. यासोबत विविध उपाययोजना केल्या आसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस दिदी, पोलिस काका, पोलिस चौकी, पीसीआर मोबाईल पथक यासह आदी पथके कार्यरत केले आहेत. 

यांची होती उपस्थिती

डॉ. करूणा जमधाडे, जयश्री जैस्वाल, विद्या आळणे, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डॉ. विद्या पाटील, संगिता बियाणी, वंदना गुंजकर, सिमा वाकडे, सुष्मा गहेरवार, पोलिस उपाधीक्षक अभिजीत फस्के, धनंजय पाटील, सिद्धेश्‍वर धुमाळ, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले, अनिरूद्ध काकडे, साहेबराव नरवाडे, संजय ननवरे, अनंत नरुटे, पंडीत कच्छवे, फौजदार सविता खर्जूले, ॲड. अस्मिता वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.  

loading image