सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट - एनएसयूआय

राजेभाऊ मोगल
बुधवार, 10 जुलै 2019

- सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट असल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे.
- 'आरएसएस' या संघटनेचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अशा स्वरूपात अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जात आहे.
-नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) याबद्दल विरोध दर्शवला.

औरंगाबाद : सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट असल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोचविणारी संघटना म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घालण्याचे निर्देश दिलेल्या आरएसएस या संघटनेचा स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अशा स्वरूपात अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जात असून, इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्‌यंत्राला एनएसयूआयने विरोध दर्शविला आहे.  

याबाबत मंगळवारी (ता. 09) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिलेल्या निवेदनात म्हटले, 'की सारा देश इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यचळवळीत उतरला होता. त्यावेळी आरएसएस (राष्ट्रीय सेवा संघ) आणि त्यांना मानणारे काय करीत होते?'

ते पुढे म्हेहणाले, 'सर्वश्रुत असताना आरएसएसचा इतिहास शाळेत शिकवण्याचे भयानक कारस्थान या देशात सुरू आहे. या संघटनेच्या अस्तित्वात नसलेला इतिहास काल्पनिक संदर्भाच्या आधाराने अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत आहे. यामुळे भावी पिढी खऱ्या इतिहासाला पोरकी होईल, त्यामुळे यास आमचा तीव्र विरोध असेल'.

दरम्यान एनएसयुआयकडून देण्यात आलेल्या निवेदनावर अभिषेक शिंदे, हर्षल जाधव, रोहित राठोड, ऋषिकेश लांडे, सोहम जाधव, ऋषिकेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSUI criticise on Government for RSS based syllabus in Book