
अंकुशनगर (जि. जालना) : ‘बीड जिल्ह्यात आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आम्हाला अटक करा. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. आमच्याबाबतची तत्परता दाखवता, तशी मनोज जरांगेंच्या बाबतीत दाखवा. जरांगे हे गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहेत. साडेअठ्ठावीस किलोचे हे भूत राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहे, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.