
बीड : राज्य शासनाने मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडत कागदपत्रांची शहानिशा न करता अनेकांना बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम केले. त्यामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आले असल्याचा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला. ‘ओबीसी समाज आरक्षण बचाव’ या संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती होती.