ओबीसी समाजाचा आज विविध मागण्यांसाठी मोर्चा

आनंद इंदानी
Sunday, 24 January 2021

बदनापूर शहरात ओबीसी मोर्चाच्या जनजागृतीसाठी दुचाकी फेरी, आज जालन्यात होणाऱ्या ओबीसी मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन

 

बदनापूर (जालना): जालन्यात 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मोर्चाच्या जनजागृतीसाठी शनिवारी (ता. 23) बदनापूर शहरात दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यानंतर झालेल्या बैठकीत जालना येथे होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात नियोजन करण्यात आले. या मोर्चात बदनापूर तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

या संदर्भात फुलेनगर येथील संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात ओबीसी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जालना येथे आज (24 जानेवारी) रोजी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात बदनापूर तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांची उपस्थिती गरजेची आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. शिवाय बदनापूर शहरातील प्रमुख मार्गांवर दुचाकीफेरी काढून सकल ओबीसी समाजाचे संघटन दाखवत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला राजेंद्रकुमार जायस्वाल, गजानन गिते, भाऊसाहेब घुगे, शेख मतीन, रघुनाथ खैरे, गोरखनाथ खैरे, फेरोज खान पठाण, शिकुरबेग मिर्झा, सुनील बनकर, महादू गिते, जगन्नाथ बारगाजे, शेख वजीर, गणेशलाल टाक, रघुनाथ होळकर, मश्चिन्द्र होळकर, शेख युनूस हुसैन, उद्धव खैरे, सय्यद जलील, सय्यद रफिक, प्रल्हाद जाधव, मोबिन खान, शेख फारुख आदींसह असंख्य ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते.
 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obc morcha news jalna political news jalna breaking news of jalna

Tags
टॉपिकस
Topic Tags: