
OBC Reservation
Sakal
रेणापूर : मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचं आरक्षण संपविलं आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाचं कसं, अशी चिंता व्यक्त करत व घोषणा देत ( बुधवारी ता.१० ) सायंकाळी वांगदरी, ता. रेणापूर येथील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने आता ओबीसींच्या आरक्षणाचं कसं अशा घोषणा देत मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याने ओबीसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिट्टी देखील लिहून ठेवली आहे.