chhagan bhujbal
sakal
रेणापूर (जि. लातूर) - ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ओबीसींना मंडल आयोगापासून आरक्षण मिळाले आहे. आता ते १७ टक्केच शिल्लक राहिले आहे. त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठीचा लढा सुरू आहे. त्याचा पहिला बळी भरत कराड ठरला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, आमचा लढा तीव्र करू,’ असा निर्धार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला.