Snapchat Love Story: स्नॅपचॅटवर प्रेम ठरले पठ्याने थेट ओडिसा गाठले ; प्रेयसीला घेऊन पठ्ठ्या थेट गावात हजर

स्नॅपचॅटवर जुळलेलं प्रेम ओडिसातून कन्नडपर्यंत; प्रियकरासोबत राहण्यासाठी तरुणीची नोटरीवर ठाम भूमिका, नातेवाईक आणि पोलिस चकित
A 19-year-old youth from Kannad travelled to Odisha after falling in love with a girl on Snapchat and later brought her to his village.

A 19-year-old youth from Kannad travelled to Odisha after falling in love with a girl on Snapchat and later brought her to his village.

Sakal

Updated on

​कन्नड : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, याचाच प्रत्यय आणून देणारी एक आगळीवेगळी आणि तितकीच फिल्मी प्रेमकाहाणी कन्नड तालुक्यात समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'स्नॅपचॅट'वर जुळलेल्या प्रेमाखातर कन्नड तालुक्यातील एका तरुणाने थेट ओडिसा राज्य गाठले. तिथे जाऊन तो केवळ आपल्या प्रेयसीला भेटलाच नाही, तर महिनाभरापूर्वी तिला सोबत घेऊन थेट आपल्या गावी परतला. या प्रकरणाचा माग काढत ओडिसा पोलीस थेट कन्नड तालुक्यात पोहोचले, मात्र मुलीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हिंदी भाषेत केलेली नोटरीने पोलीस आणि मुलीचे नातेवाईकही अवाक झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com