साक्षगंध एकीसोबत तर बहुल्यावर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

युवकासह दोघांवर सोनखेड (ता. लोहा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : साक्षगंध एकीसोबत झालेल्या युवतीची फसवणूक करून दुसऱ्याच मुलीसोबत बोहल्यावर चढलेल्या युवकासह दोघांवर सोनखेड (ता. लोहा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लोहा तालुक्यात घडला.

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार लोहा तालुक्यातील एक मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. यावेळी तिला सोमठाणा ( ता. वसमत, जिल्हा हिंगोली) येथील आनंदराव तुकाराम कदम यांनी आपला मुलगा वैभव आनंदराव कदम याच्याशी लग्न करण्याची मागणी केली. मागणीनुसार त्या मुलीची सोयरीक झाली. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी दोन लाख रुपये खर्च करून थाटामाटात साक्षगंध कार्यक्रम हा ता. आठ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या नातेवाईकांसमक्ष केला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याची विनंती केली. यावेळी वरपक्षाकडून मुलगा सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असल्याचे सांगुन ता. २२ डिसेंबर २०१९ रोजी परस्पर दुसऱ्या मुलीसोबत वैभव कदम याचे लग्न लावून दिले. 

हेही वाचा - मकर संक्रांत विशेष : कशासाठी आहे हा सण वाचा सविस्तर

पिता- पुत्रावर गुन्हा दाखल
ही बाब साक्षगंध केलेल्या मुलीच्या वडिलास समजताच एकच धक्का बसला. त्यानंतर त्या मुलाच्या गावी जावून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मुलीची व तिच्या पालकाची फसवणूक केली. यानंतर ही मंडळी परत आली. पिडीतेच्या पालकांनी सोनखेड पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरुन सोनखेड पोलिसांनी आनंदराव कदम आणि वैभव कदमविरुध्द सोमवारी (ता. १३) जानेवारी रोजी फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार करीत आहेत. 

सानिका पब्लीक स्कूलमध्ये दंत रोग तपासणी

नांदेड :  राजमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सानिका पब्लीकस्कूलच्या वतीने मोफत दंत तपासणी व मार्गदर्शन शिबिरास चिमुकल्या विद्यार्थीसह पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.  
 
सानिका बालवाडी पब्लीकस्कूल सरपंचनगरच्यावतीने मोफत एक दिवसीय दंत विकार आणि त्यावरील  निदान व मार्गदर्शनाचे भव्य असे शिबिराचे आयोजन डॅा .कृष्णा इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले विद्यार्थ्याची मोफत दंत तपासणी करून दंत विकार कसे टाळावे व दातांची काळजी कशाप्रकारे घ्यायची व त्यावरील निदान कसे करायचे यांची योग्यरित्या सल्ला व  मार्गदर्शन करण्यात आले.  चिमुकल्या विद्यार्थी मित्रांचे व पालकांचे समाधान केले. या शिबिरास चिमुकल्या बालकासह पालक व परिसरातील असंख्य जनतेनेसुध्दा या शिबिरांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. 

येेथे क्लीक कराराजेश नहारचा घात गावठीच्या गोळीनेच...

यांनी घेतले परिश्रम 
या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी म्हणून पुजा कळसकर हेात्या, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पाडुरंग पालीमकर यांची होती. सानिका बालवाडी पब्लीकस्कुल नेहमीच असे आगळे वेगळे स्तुत्य असे उपक्रम राबवून आपली सांस्कृतीक व सामाजीक बांधीलकी जपत असते. या उपक्रमाचा विद्यार्थी मित्रासोबत पालक व परीसरातील जनतेने कौतुक केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता अनिता रत्नपारखे, नेहा पालीमकर, विजय पालीमकर, बालाजी कळसकर, महादेवी घेवारे, जयश्री नरवटे, र्कितीमाला कानडे आदीने परीश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The odor of the testimony is one and the same ...