esakal | अवैधरित्या दारु व दोन महिलांसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा; जिंतूर पोलिसांची कारवाई

बोलून बातमी शोधा

जिंतूर पोलिस

अवैधरित्या दारु व दोन महिलांसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा; जिंतूर पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : अवैधरित्या गावठी दारु व दारु तयार करण्याचे रसायन बाळगल्याच्या आरोपावरुन तालुक्यातील साईनगर तांडा येथील दोन महिलांसह पाचजणांविरुध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्र संचारबंदी असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चोरीछुपे अवैधरित्या देशी- विदेशी दारुसह गावठी बनावटीची दारु विक्री सुरुच आहे. कांही ठिकाणी तर हातभट्टी लावून गावठी दारु तयार करण्यात येत आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना समजली असता परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलिस नायक संगीता वाघमारे, पोलिस नायक श्री. पैठणे, होमगार्ड सुनील राठोड, किरण आडे, गुलफराज सय्यद, विष्णू डाखुरे, मुकेश खान यांच्या पथकाने रविवारी (ता. १९) सायंकाळी साईनगर तांडा येथे एका घरी छापा टाकला असता त्या घरात पंधरा लिटर गावठी दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारे ११५ लिटर रसायन याप्रमाणे एकूण दहा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

हेही वाचा - पोतरा येथे चैत्रशुध्द एकादशीपासून हनुमान जयंती पर्यंत पवित्रेश्वर महादेवाची यात्रा असते. आमल्या बारशीची ही यात्रा सर्वदूर परिचित आहे

तो पोलिसांनी जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन संध्याकाळी सातनंतर भिमा चतरु जाधव, गोविंद गोवर्धन पवार, बबन थावरा राठोड, कमळाबाई काळूराम चव्हाण व लच्छुबाई लिंबा राठोड यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे