ZP President Archanatai Patil
sakal
जेवळी - आष्टा कासार (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे 'जल जीवन मिशन' आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विविध कामांमधील कथित घोटाळ्याचे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून, ग्रामस्थांच्या उपोषणाच्या इशारानंतर गुरुवारी (ता. १८) जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी प्रमुख अधिकाऱ्यास येथे भेट देऊन या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला.