अरे बापरे, बांधकाम साहित्याला आला सोन्याचा भाव

कळमनुरी ः वाळूअभावी शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील रखडलेली बांधकामे.
कळमनुरी ः वाळूअभावी शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील रखडलेली बांधकामे.

कळमनूरी ः तालुक्यामधील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे वाळूला सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे. वाळूअभावी बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असताना वाळू उपलब्ध होत नाही म्हणून शासनाच्या रमाई व शबरी घरकुल व पंतप्रधान निवास योजनेंतर्गत जवळपास चार हजार ७०० लाभार्थींची घरकुलाची बांधकामे अर्धवट अवस्थेत रखडल्या गेली आहेत. त्यामुळे या लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी आता पुढे आली आहे.

जिल्ह्यात वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. वाळू घाटांचे शासकीय मूल्य, वाळू घाट घेण्यासाठी कंत्राटदारांनी केलेली साखळी, कुठला घाट घ्यावयाचा किंवा कुठला घाट सोडून द्यायचा या बाबत कंत्राटदारांची मनमानी पाहता, मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील वाळू घाटांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कंत्राटदारांना परवडतील त्याच मोजक्या वाळू घाटांचा लिलाव प्रक्रिया होत आहे. त्यामुळे उर्वरित वाळू घाटांचे लिलाव प्रक्रिया अडकून पडल्याचे चित्र आहे.

सर्वसामान्यांना मिळेना सहजासहजी वाळू  
सर्वसामान्य बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सहजासहजी वाळू उपलब्ध होत नसल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. यामध्येही चोरट्या पद्धतीने वाळू विक्री करणाऱ्या वाळू माफियांनी वाळूच्या एका ब्रासची किंमत साडेसात हजार ते आठ हजारांच्या दरम्यान केल्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. दुसऱ्या बाजूला शासनाच्या रमाई, शबरी घरकुल, पंतप्रधान निवास योजनेमधील तालुक्यातील जवळपास ४७०० लाभार्थींनी घरकुल मंजूर झाल्यामुळे आपली जुनी घरे जमीनदोस्त करून बांधकाम हाती घेतली आहे.

घरकुल मिळालेले लाभार्थी दुहेरी संकटात
वाळूअभावी शासनाची घरकुल योजना संकटात सापडली आहे. दुसऱ्या बाजूला घरकुल मंजूर झाले म्हणून बांधकाम हाती घेतलेल्या लाभार्थींना आता वाळू मिळत नसल्यामुळे बांधकाम बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे राहते घरही गेले व अर्धवट बांधकामासाठी वाळू मिळत नसल्यामुळे घरकुल मिळालेले लाभार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत.

लाभार्थींना पाच ब्रास वाळू द्या
लाभार्थीप्रमाणेच शासनाची घरकुल योजना दिलेल्या मुदतीत पूर्णत्वास नेणे शक्य होत नसल्याचे पाहून संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनीही आता महसूल विभागाकडे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना बांधकाम करण्याकरिता शासन निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

वाळू उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन
शासकीय गृहनिर्माण योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थींना विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यासंदर्भात डॉ.सतीश पाचपुते, बबन डुकरे, नागोराव खुडे, शंकर फोपसे, भारत धनवे, एकनाथ आसोले, गंगाधर खुडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com