

Firecracker Incident on Busy Public Road
esakal
राजेंद्र व्यास
गंगापूर : सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांची सतत वर्दळ सुरू असताना, त्याच रहदारीच्या ठिकाणी एकमेकांविरुद्ध फटाके फोडत वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या चार जणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने कायगाव येथील चौकात ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.