वृद्ध, दिव्यांगाना स्मार्ट सिटीपेक्षा सेंन्सिटिव्ह सिटी हवी

स्मार्टसिटीपेक्षा सेंन्सिटीव्हीटी सिटी हवी, अशी अपेक्षा महिला, वृद्ध आणि दिव्यांगानी केली.
aurangabad
aurangabadsakal
Updated on

औरंगाबाद : स्मार्टसिटीच्या अनुषंगाने दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक व महिलांसाठी काय महापालिकेकडून काय सुविधा मिळाव्यात यासाठी अर्बन रिसर्च फाऊंडेशन, सक्षम संघटन व विहंग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कॅनोट प्लेस परीसरात मंगळवारी (ता.३१) सर्वे करण्यात आला. स्मार्टसिटीपेक्षा सेंन्सिटीव्हीटी सिटी हवी, अशी अपेक्षा महिला, वृद्ध आणि दिव्यांगानी केली.

भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. याविकास कामाच्या माध्यमातून शहरवासियांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार आसल्याने शहराची अधिक जोमाने विकास होत आहे. या स्मार्टसिटीत दिव्यांग, वृद्ध आणि महिलांसाठी काय सुविधा असाव्यात याबाबत कॅनोट प्लेसमध्ये सर्वे करण्यात आला. शहरात सुमारे चार दोन लाखांपेक्षा जास्त वृद्ध, पाच लाखांपेक्षा जास्त महिला व पाच हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांची संख्या आहे. या दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना शहरातील मॉल, उद्यान, हॉटेल्स, दुकांनामध्ये रेलींग, रॅम्प, दिशादर्शक, स्वच्छतागृह अशा सुविधा नसल्यामुळे बाहेर फिरण्यास अनेक अडचणी येतात. स्मार्टसिटी योजनेत दिव्यांग, वृद्धांसाठी फूटपाथवर व्हिलचेअर घेवून जाण्यासाठी सुविधा, दिशादर्शक, रस्ता पास करण्यासाठी गतीरोधक या सुविधांचा देखील प्रशासनाकडून विचार करण्यात यावा, अशी अपेक्षा विहंग विशेष मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अदिती शार्दूल यांनी केली.

aurangabad
मोठ्या ११ धरणातील पाणीसाठा झाला साठ टक्के

मुकबधिर असलेल्या व्यक्तींना बोलता येत नाही. लोकांना त्यांचे बोलणे समजत नाही. स्मार्टसिटीचा विचार करताना महामार्गावर ज्याप्रमाणे दिशादर्शक चिन्ह असलेल्या पाट्या असतात. तशा पाट्या लावण्यात याव्यात. म्हणजे दिव्यांग, कर्णबधिरांना यांचा उपयोग होईल.

- सागर बडवे, कर्णबधिर ऑलंम्पिक जलतरणपट्टू

दिव्यांग व विशेष मुलांना शहरातील मॉल्स, हॉटेल्स, उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी जाता येत नाही. गेले तरी अनेक अडचणी येतात त्यामुळे नागरीकांकडून खिल्ली उडवली जाते. या स्मार्टसिटीत दिव्यांगांना बाहेर फिरण्यासाठी चेकर्स, रोलींग तसेच रॅम्प अशा सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

- ओकांर वैद्य, दिव्यांग कार्यकर्ते, दिव्यांगासाठी जागरुकता वाढविणारे कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com