Omicron In Latur|लातुरात ओमिक्रॉनचा शिरकाव,मराठवाड्यातील पहिला रूग्ण

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव मराठवाड्यात झाला आहे.
omicron
omicron

लातूर : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव मराठवाड्यात झाला आहे. लातूर शहरात दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी (ता.आठ) आल्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल सोमवारी (ता.१३) सायंकाळी आला असून या प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. हा प्रवाशी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असून त्याला सौम्य लक्षणे असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (Latur Collector Prithviraj BP) यांनी दिली. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना शोधून त्यांची आरटीपीसीआर तपासणी सुरू आहे. (Omicron In Latur First Patient In Marathwada Region)

omicron
Latur|उदगीरात चेकअपचे निमित्त करुन कंपाउंडरने केला महिलेचा विनयभंग

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १११ प्रवाशी दाखल झाले असून त्यातील ६५ प्रवाशांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली. यात आतापर्यंत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दुबईहून आलेल्या एकाचा अहवाल बुधवारी, तर मालदीवहून आलेल्या दुसऱ्याचा अहवाल शुक्रवारी (ता.दहा) पॉझिटिव्ह आला होता. यामुळे दोघांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. यातील दुबईहून आलेल्या प्रवाशाचा अहवाल प्रयोगशाळेने सोमवारी सायंकाळी दिला असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले. हा प्रवाशी परदेशातून आल्यापासून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असून त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तर पुण्याच्या प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी प्रवाशाचा अहवाल आला असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान हा प्रवाशी मुळचा औसा येथील असला तरी तो लातूर शहरात खूप ठिकाणी फिरल्याचीही चर्चा घडून होत आहे.

omicron
ST Strike | लातुर-निलंगा बसवर दगडफेक, खिडकीच्या काचा फुटल्या

दोन डोसमुळे सौम्य लक्षणे

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशाला सौम्य लक्षणे असून त्याची प्रकृती स्वस्थ असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे या प्रवाशावर ओमिक्रॉनचा प्रभाव दिसून येत नाही. हे लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पृथ्वीराज यांनी केले. कोरोना व ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी कोरोना लस तसेच मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे आदी कोरोना प्रतिबंधाच्या नेहमीच्या नियमांचे पालन करणे, एवढे दोनच पर्याय आहेत. नागरिकांनी या पर्यायाबाबत सजग रहावे, असेही पृथ्वीराज यांनी सांगितले.

omicron
लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका, जया बच्चन यांची मोदींवर टीका

नॉन रिस्क देशातील प्रवाशी

ओमिक्रॉनची लागण झालेला प्रवाशी हा जोखीम नसलेल्या (नॉन रिस्क) देशातून आलेला आहे. यामुळे नॉन रिस्क देशातून आलेल्यांना ओमिक्रॉनची लागण होत नसल्याचा समज या निमित्ताने दूर झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत परदेशातून आलेल्या १११ पैकी रिस्क असलेल्या देशातील नऊ तर रिस्क नसलेल्या देशातील १०२ प्रवाशी आहे. यातील आरटीपीसीआर केलेल्यापैकी ४९ प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आले तर १४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पॉझिटिव्ह आलेल्या दोन फॉरेन रिटर्नपैकी अजून मालदीवहून आलेल्या प्रवाशाचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल अजून बाकी आहे. त्याच्याही अहवालाची आरोग्य विभागाला उत्सुकता लागली आहे.

तेरा प्रवाशी ट्रेस नाहीत

आतापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी सर्वाधिक ५१ प्रवाशी लातूर शहरातील आहेत. उर्वरित साठपैकी उदगीर तालुक्यातील ३०, औसा - नऊ, निलंगा - १४, देवणी - दोन, जळकोट - एक, अहमदपूर - दोन, लातूर ग्रामीण - एक व चाकूर तालुक्यातील एका प्रवाशाचा समावेश आहे. यापैकी ९८ प्रवाशांचा ठावठिकाणी शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले असून तेरा प्रवाशांचा संपर्क होत नसल्याची स्थिती आहे. यात लातूर शहरातील दहा, उदगीर, लातूर व चाकूरमधील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे. चुकीच्या मोबाईल नंबरमुळे संपर्क करण्यात अडचणी येत असून त्यांच्या पत्त्यावर जाऊन शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com