esakal | 'पीक कर्ज देण्यास बँकेने टाळाटाळ केली तर मला कॉल करा'
sakal

बोलून बातमी शोधा

om nimbalkar

'पीक कर्ज देण्यास बँकेने टाळाटाळ केली तर मला कॉल करा'

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर): राष्ट्रीयकृत बँकाकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. बँका जर पीककर्ज देत नसतील तर शाखेत जा आणि मला फोन कॉल करा, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी (ता. १६) शेतकऱ्यांना केले. येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेने माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते उपस्थित होते

बँकांनी सरळ व सोप्या मार्गांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वाटप करावे, अशा सूचना खासदार निंबाळकर यांनी केल्या. शिवाय जिरायत व बागायत क्षेत्रासाठी किती प्रमाणात कर्ज वाटप करता येते याबाबत सर्व बँकांनी त्यांच्या शाखेत दर्शनी भागात माहिती फलक लावावे, असेही आदेश दिले. तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकाची कर्जवाटपाची टक्केवारी अतिशय निराशाजनक असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप चांगल्या प्रकारे केले असल्याचे कौतुक त्यांनी केले.

हेही वाचा: हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली

शिवाय शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासंदर्भात रिझर्व्ह व लिड बँकेकडून आदेश दिले असतानाही राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज देताना शेतकऱ्यांना हेलपाटे घालायला लावतात ही बाब अतिशय निंदनीय असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने खरीप हंगामासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी व सहकारी बँकांनी त्वरित कर्जवाटप करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, लातूर जिल्हा बँकेने उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले. या बँकेचे खासदारांनी कौतुक केले.

loading image