बोक्याने फोडली हॉटेलची काच; पोलिसांनी केली अटक 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

सुहास लांजेवार यांचे बसस्थानकासमोर हॉटेल आहे. रईस बोक्‍या व त्याचा साथीदार वसीम खान यांनी लांजेवार यांना दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र लांजेवार यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे बोक्‍याने हॉटेलच्या स्वागतकक्षाची काच फोडली

औरंगाबाद : हॉटेलचालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेलची काच फोडून पळ काढत रस्त्यात एका व्यक्तीला लुटणारे आरोपी तथा कुख्यात गुन्हेगार मोहम्मद रईस ऊर्फ बोक्‍या मोहमंद हनिफ (24, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) व वसीम खान अख्तर खान (24, रा. गरमपाणी परिसर) या दोघांना पोलिसांनी गुरुवारी (ता.19) दुपारी अटक केली. 

हेही वाचा-लातूरात तहरिक ए पार्टींच्या कार्यकर्त्यांनी केले मुंडन आंदोलन (वाचा कशामुळे)

प्रकरणात सुहास लांजेवार (33, रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, लांजेवार यांचे बसस्थानकासमोर हॉटेल आहे. रईस बोक्‍या व त्याचा साथीदार वसीम खान यांनी लांजेवार यांना दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र लांजेवार यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे बोक्‍याने हॉटेलच्या स्वागतकक्षाची काच फोडली व दोघे आरोपींनी भोईवाड्याच्या दिशेने धूम ठोकली. लांजेवार यांनी दोघा आरोपींचा पाठलाग सुरू केला. 

क्लिक करा-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

काही अंतरावर असलेल्या एका व्यायामशाळेजवळ आरोपींनी एका व्यक्तीच्या खिशातून बळजबरी पाचशे रुपये घेत धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र एका भिंतीवरून उडी मारताना वसीम खान हा खाली पडला. त्यानंतर त्याचा पाठलाग करणाऱ्या इतर लोकांनी वसीमसह बोक्‍याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी वसीम खानकडून चोरलेल पाचशे रुपये जप्त केले. प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला. दरम्यान, दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवागनी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रभारी न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी दिले. 

हे वाचलंत का?-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested With Hotel Glasses Broker