जालन्यात पुन्हा एक कोरोना बाधित 

उमेश वाघमारे
Wednesday, 13 May 2020

जालना जिल्ह्यात आतापर्यंत १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील जवळपास सर्व रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यात पुणे, गुजरात, मुबंई आणि मालेगाव येथून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. या मुबंई येथून आलेले चार जण, मालेगाव येथून बंदोबस्तावरून आलेले राज्य राखीव दलातील सहा कर्मचारी, गुजरात येथून आलेली एक तरूणीचा समावेश आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात येथील एक परिचारिका, रंगनाथ नगर येथील एक गर्भवती महिलाही कोरोना बाधित आहे.

जालना :  जालन्यात पुन्हा एक मुबंईहुन परतलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे आता जालना जिल्ह्यात कोरोनाचे १५ रुग्ण झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी बुधवारी (ता.१३) दिली आहे.

जालना जिल्ह्यात आतापर्यंत १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील जवळपास सर्व रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यात पुणे, गुजरात, मुबंई आणि मालेगाव येथून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. या मुबंई येथून आलेले चार जण, मालेगाव येथून बंदोबस्तावरून आलेले राज्य राखीव दलातील सहा कर्मचारी, गुजरात येथून आलेली एक तरूणीचा समावेश आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात येथील एक परिचारिका, रंगनाथ नगर येथील एक गर्भवती महिलाही कोरोना बाधित आहे.

हेही वाचा- साहेब पाय तुटायची वेळ आलीय

 दरम्यान शहरातील दुःखीनगर येथील ६५ वर्षी महिला ही कोरोना बाधित आढळली होती. तिच्या योग्य उपचार झाल्याने ती कोरोना मुक्त झाली असून तिच्या इतर आजारांवर जिल्हा सामान्य रूग्ण येथे उपचार सुरू आहेत. तर  परतूर तालुक्यतील शिरोडा येथील बाधित  महिला कोरोना मुक्त झाली असून तिला रुग्णालयातुन सुटी देण्यात आलेली आहे. 

दरम्यान मुबंई येथून परतलेला  रामनगर परिसरातील  एक तरुण ही बुधवारी (ता.१३) कोरोना बाधित असल्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे जालन्यात इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर जाऊन पोहचली आहे. परिणामी चिंतेत भर पडली असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आता प्रशासन काय पाऊले चालणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Corona Positive Patient Jalna News