धक्कादायक: जालन्यात कोरोनाचा पहिला बळी; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महेश गायकवाड
रविवार, 31 मे 2020

मुंबईवरून परतूर तालुक्यात परतलेल्या एका ४५ वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २९) रात्री मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब नमुन्याचा अहवाल रविवारी( ता.३१) सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालना: मुंबईवरून परतूर तालुक्यात परतलेल्या एका ४५ वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २९) रात्री मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब नमुन्याचा अहवाल रविवारी( ता.३१) सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा- Breaking:औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी, आज ४२ रुग्ण वाढले, एकूण @१५४० पॉझिटिव्ह

रविवारी सकाळी आरोग्य विभागाला दोन शुक्रवारी मृत्यू झालेल्या परतूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. सदर व्यक्ती परतूर तालुक्यातील मापेगाव येथे ता. १९ मे रोजी आपल्या कुटुंबासोबत मुंबईवरून परतले होते. ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण केले होते. त्यातील एका व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याला शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पॉझिटिव्ह आलेला दुसरा अहवाल जालना तालुक्यातील गोलपांगरी येथील अंगणवाडी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांनी सांगितले आहे. या दोन व्यक्तीची भर पडल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १२६ झाली असून त्यातील ४४ रुग्ण बरे झाले आहे.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

औरंगाबादेत ७० वा बळी
औंरगाबाद : शहरात कोरोनाचा आणखी एक बळी गेला असून मृत्युसंख्या सत्तर एवढी झाली. आज (ता.३१) सकाळी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५४० झाली. यापैकी ९७६ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा ३० मे रोजी सायं.५.२० वाजता उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर  खासगी रुग्णालयात १०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण ७० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One CoronaVirus Positive Patient Death Jalna News