खासदार जाधव यांनी दिला एक कोटीचा निधी 

गणेश पांडे
रविवार, 29 मार्च 2020

‘कोरोना’ विषाणुजन्य परिस्थितीत उपाययोजनेसाठी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी एक कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निधीचे पत्र दिले आहे.

परभणी :  जिल्ह्यात ‘कोरोना’चे संशयित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन पूर्ण ती खबरदारी घेत आहे. ‘कोरोना’ विषाणू संसर्गजन्य परिस्थितीत उपाययोजनेसाठी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी एक कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. रविवारी (ता. २९) या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निधीचे पत्र दिले आहे.

‘कोरोना’ विरोधात लढण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्‍याचे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे.‘कोरोना’ या विषाणूमुळे जग हादरले आहे. परभणी जिल्ह्यात ‘कोरोना’चे संशयित रुग्ण वाढत असल्याने याविरोधात जिल्हा प्रशासनाला बळ देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे रविवारी (ता. २९) निधीचे पत्र सुपूर्द केले आहे.

हेही वाचा- गल्लीबोळांतील रस्त्यावर नागरिकांचे जथ्थे

कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी
मागील २२ मार्चपासून परभणी जिल्हा व संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद केल्या आहेत. ‘कोरोना’ विषाणूची दहशत घराघरात पसरली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळत नसला तरी, संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन कोणाच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करत आहे. अनेक सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत. अशा वेळी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच खासदार श्री. जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी दिलेल्या सूचना नागरिकांनी पाळाव्यात, असेही खासदार श्री. जाधव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा...
 

विशाल सरवदे राज्यात प्रथम
परभणी :
महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या २०२० सामा‍ईक प्रवेश परिक्षेत कृषी शाखेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल सरवदे हा राज्‍यात प्रथम आला आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थी केशव सुर्यवंशी हा व्दितीय क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. तसेच महाविद्यालयाचा शिवसंदिप रणखांब आठवा क्रमांकाने तर ऋ‍तुजा पाटील तेराव्‍या, दिनेश कांबळे पंधरा तर मदन जमदाडे सोळाव्‍या क्रमांकाने उर्त्‍तीण झाले आहेत. परभणी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम येण्‍याचे हे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ.अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मराज गोखले यांनी कौतुक केले. परिक्षा राज्‍यातील चारही कृ‍षि विद्यापीठातील साडेसात हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore funds provided by MP Jadhav