परभणी : कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील चित्रपटगृह चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सलग तीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद राहिल्याने खर्चाचा ताळमेळ बसविता-बसविता या व्यवसायिकांची गोळाबेरीजच चुकली आहे.
कोरोना विषाणू संसर्गानंतर २३ मार्चपासून देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनचा देशातील प्रत्येक इंडस्ट्रिजला फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकट ओढावले असून यातून बाहेर कसे पडावे याचा विचार सर्वत्र सुरू आहे. अधिच प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने चित्रपटगृहांची आवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे ऐरवी फस्ट डे फस्ट शोचे तिकिट मिळविण्यासाठी लागलेली मारामार आता मात्र चित्रपटगृहाच्या आवारात दिसत नाही. कोट्यवधी रुपये गुंतवूनदेखील चित्रपट पाहण्यासाठी म्हणावे तसे प्रेक्षक जमा होत नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. मल्टिप्लेक्सच्या जमान्यातही दर्जेदार आसनव्यवस्था, अतिउच्च दर्जाची संगीत व्यवस्था असतांनाही प्रेक्षकांची म्हणावी तशी दाद मिळत नाही. असे असतांनाही चित्रपटगृह चालकांनी हा व्यवसाय त्यांच्या स्वकर्तृत्वावर टिकवून ठेवला आहे.
हेही वाचा व पहा : Video : कोरोनाचे विघ्न बाप्पाच्या मूर्तिकारांवर -
लॉकडाउनचा सर्वाधिक फटका
संपूर्ण देशात २३ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व इंडस्ट्रिज बंद आहेत. परंतु, चित्रपटगृहांना बंद करण्याचे आदेश ता. १५ मार्चपासूनच देण्यात आले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वाधिक काळ लॉकडाउन राहिलेला व्यवसाय म्हणजे चित्रपटगृहांचा आहे. अधिच प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने डबघाईला आलेल्या या व्यवसायाला आता लॉकडाउनमुळे अधिकच घरघर लागली आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका या व्यावसायिकांना बसला आहे.
कमाई बंद, पण खर्च सुरूच
जिल्ह्यात जवळपास आठ ते दहा चित्रपटगृह आहेत. त्यात केवळ दोन चित्रपटगृह मल्टिप्लेक्स आहेत. एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाचे महिन्याचे उत्पन्न आठ ते नऊ लाख असते. तर सिंगलप्लेक्स चित्रपटगृहाचे मासिक उत्पन्न तीन ते चार लाखांच्या घरात असते. त्यामुळे या सगळ्या चित्रपटगृहांच्या उत्पन्नाची बेरीज केली तर त्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून एक कोटीच्या जवळपास उत्पन्न बुडाले आहे. परंतु, चित्रपटगृहांचे वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार तसेच देखभाल दुरुस्तीवर दरमहा लाखो रुपये खर्च होत आहे.
कोणताही निर्णय नाही
आमचे व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता हळूहळू अनलॉक केले जात असले तरी आमच्या व्यवसायाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्राने नुकत्याच केलेल्या आत्मनिर्भर योजनेंतर्गत आमच्या इंडस्ट्रिजबद्दल कोणताही निर्णय नाही.
- हेमंतराव जामकर, चित्रपटगृह व्यावसायिक, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.